- पुण्यामध्ये असताना नरेंद्र दाभोलकर दररोज बालंगधर्व रंगमंदिराजवळ प्रभात फेरीसाठी जात असत
- मंगळवारी सकाळी प्रभात फेरीसाठी निघाल्यावर ते महर्षी शिंदे पूलावरून ओंकारेश्वर मंदिराच्याविरुद्ध बाजूने साधना साप्ताहिकाच्या कार्यालयाच्या दिशेने निघाले होते
- पूलावर असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोऱांनी गोळ्या झाडल्या
- हल्लेखोरांनी दाभोलकरांवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्यात झाडण्यात आल्या. एक गोळी त्यांच्या पाठीच्या बाजूला लागली आणि एक चुकीच्या दिशेने गेली
- गोळ्या लागल्यामुळे दाभोलकर घटनास्थळीच कोसळले
- गोळीबार केल्यावर हल्लेखोर स्प्लेंडर दुचाकीवरून पळून गेले
- हल्लेखोर २५ ते ३० वयोगटातील होते. हल्लेखोरांपैकी एकाने टोपी घातली होती आणि दुसऱयाच्या पाठीवर बॅग होती. घटना घडल्यावर हल्लेखोर रविवार पेठेच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले
- एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना बघितल्यावर पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली
- पोलिसांनी दाभोलकरांना ससून रुग्णालयात हलविले
- ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले
- दाभोलकर यांच्या शर्टच्या खिशामध्ये एक छायाचित्र आणि दोन धनादेश होते. त्यापैकी एका धनादेशावर दाभोलकर यांचे नाव लिहिले होते, असे पोलिसांनी सांगितले
- छायाचित्रावरून आणि साधना साप्ताहिकाच्या काही कार्यकर्त्यांनी ओळख पटविल्यावर पोलिसांनी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याचे घोषित केले
आणखी वाचा