• पुण्यामध्ये असताना नरेंद्र दाभोलकर दररोज बालंगधर्व रंगमंदिराजवळ प्रभात फेरीसाठी जात असत
  • मंगळवारी सकाळी प्रभात फेरीसाठी निघाल्यावर ते महर्षी शिंदे पूलावरून ओंकारेश्वर मंदिराच्याविरुद्ध बाजूने साधना साप्ताहिकाच्या कार्यालयाच्या दिशेने निघाले होते
  • पूलावर असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोऱांनी गोळ्या झाडल्या
  • हल्लेखोरांनी दाभोलकरांवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्यात झाडण्यात आल्या. एक गोळी त्यांच्या पाठीच्या बाजूला लागली आणि एक चुकीच्या दिशेने गेली
  • गोळ्या लागल्यामुळे दाभोलकर घटनास्थळीच कोसळले
  • गोळीबार केल्यावर हल्लेखोर स्प्लेंडर दुचाकीवरून पळून गेले
  • हल्लेखोर २५ ते ३० वयोगटातील होते. हल्लेखोरांपैकी एकाने टोपी घातली होती आणि दुसऱयाच्या पाठीवर बॅग होती. घटना घडल्यावर हल्लेखोर रविवार पेठेच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले
  • एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना बघितल्यावर पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली
  • पोलिसांनी दाभोलकरांना ससून रुग्णालयात हलविले
  • ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले
  • दाभोलकर यांच्या शर्टच्या खिशामध्ये एक छायाचित्र आणि दोन धनादेश होते. त्यापैकी एका धनादेशावर दाभोलकर यांचे नाव लिहिले होते, असे पोलिसांनी सांगितले
  • छायाचित्रावरून आणि साधना साप्ताहिकाच्या काही कार्यकर्त्यांनी ओळख पटविल्यावर पोलिसांनी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याचे घोषित केले
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How narendra dabholkar shoot dead in pune