पुणे : गरोदरपणातील प्रत्येक टप्प्यात शरीरात मोठे बदल होतात. त्यातील संप्रेरकांमधील बदल हे आतड्यांसंबंधी हालचाली मंदावण्यास कारणीभूत ठरतात. गरोदरपणात ‘प्रोजेस्टेरॉन’ नावाचे संप्रेरक पचनावर परिणाम करते आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्यासाठी आहारासोबत इतरही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

गरोदरपणात शारीरिक क्रिया मंदावलेल्या असतात. त्यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते. त्यामुळे पोट साफ होण्याची क्रिया हळूवार गतीने होते. त्यातून बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागतो. गरोदर होण्याआधी तुमचे आतड्याचे आरोग्य चांगले असावे. हे निरोगी गर्भाकरिता फायदेशीर ठरते. आतड्यांची आरोग्य चांगले न राखल्यास गर्भधारणेत आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आतडे निरोगी असणे हे प्रत्येकासाठी महत्वाचे आहे, मात्र गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी हे अधिक गरजेचे ठरते. आतड्यातील मायक्रोबायोमचा नवजात बाळाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. आतड्यासंबंधीत तक्रारी बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात, अशी माहिती मदरहूड हॉस्पिटलमधील आहारतज्ज्ञ डॉ. इंशारा महेदवी यांनी दिली.

Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Lancet study finds iron calcium and folate deficiency among Indians
भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन
40 patients waiting for corneal transplant in Nagpur
नागपुरात ४० रुग्ण बुब्बुळ प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत; केवळ इतक्याच रुग्णांना दृष्टी…

आणखी वाचा-सायकलसह पुणे मेट्रोतून प्रवास करा पण…

काय उपाय करावेत?

  • भरपूर पाणी प्या : शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राखणे गरजेचे आहे. पाणी, फळांचा रस, भाज्यांचे सूप, पेज अशाप्रकारे द्रव पदार्थांचे सेवन करावे.
  • तंतूमय पदार्थांचे सेवन : आहारात तंतूमय पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात असावे. यामध्ये डाळी, भाज्या, पालेभाज्या, कडधान्ये, गहू यांचा समावेश असावा.
  • एकाच वेळी जास्त जेवू नका : एकाच वेळी भरपेट न जेवता ठराविक अंतराने अन्नाचे सेवन करा. त्यामुळे पचन होण्यास मदत होईल.
  • सक्रिय राहा : सतत एका जागी सतत बसून न राहता शारीरीक हलचाल करा. डॅाक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करा.
  • आरामदायी कपडे हवेत : गरोदरपणात घट्ट कपडे घालणे टाळा, त्यामुळे अन्नाचे नीट पचन होऊ शकेल.
  • चहा,कॉफी टाळा : चहा आणि कॉफीचे सेवन कमी करा. कारण त्यामुळे अपचन, गॅस आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता असते.