पुणे : ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) हा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासह (सर्व्हायकल कॅन्सर) विविध प्रकारच्या कर्करोगांस कारणीभूत ठरतो. यामुळे एचपीव्ही प्रतिबंधक लस बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत दिली जाणार आहे. ही लसीकरण मोहीम मंगळवारपासून (दि.१६) सुरू होत आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारे एचपीव्ही सामूहिक लसीकरण केले जात असल्याचा दावा महाविद्यालयाने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मुरलीधर तांबे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.यल्लप्पा जाधव उपस्थित होते. महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या १ हजार विद्यार्थ्यांना लस देण्याच्या उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही लस घेणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक नसून ऐच्छिक आहे. सुरूवातीच्या टप्प्यात लसीकरणात विद्यार्थिनींना प्राधान्य दिले जाणार असून, त्यानंतर विद्यार्थ्यांना लस दिली जाईल. या लसीकरणात सिरम इन्स्टिट्यूटची सर्व्हाव्हॅक ही एचपीव्ही लस दिली जाणार आहे.

हेही वाचा…सीएनजी पंपावर गॅसचे ‘नोझल’ उडाल्याने कामगाराचा डोळा निकामी, धनकवडीतील घटना; पंप मालकासह व्यवस्थापकाविरुद्ध गु्न्हा

याबाबत डॉ. पवार म्हणाले की, वैद्यकीय आणि परिचर्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. एचपीव्ही लस महिलांसोबत पुरुषांसाठीही आहे. ही लस घेऊन पुरुष जननेंद्रियाच्या कर्करोगाला प्रतिबंध करू शकतात. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात या लशीचा अद्याप समावेश नाही मात्र, खासगी रुग्णालयात ही लस देण्यात येते. सध्या ९ ते १४ वर्षे वयोगटातील व्यक्तींना या लशीचे दोन डोस देण्यात येतात तर १५ ते २६ वयोगटातील व्यक्तींना तीन डोस देण्यात येतात. या लसीकरणासाठी सिरम इन्स्टिट्यूट तीन हजार डोस उपलब्ध करून देणार आहे.

हेही वाचा…२९ गावांच्या हरकतींवरील सुनावणीला ग्रामस्थांचा विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना बजावली नोटीस

एचपीव्ही संसर्ग हा विविध प्रकारच्या कर्करोगांना कारणीभूत ठरतो. त्यामुळे वैद्यकीय आणि परिचर्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारे महाविद्यालयाकडून एचपीव्ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय