राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी सकाळी जाहीर करण्यात आला. यंदा निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून, या विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.६८ टक्के इतका लागला आहे. दुसरीकडे नाशिक विभागाचा निकाल सर्वांत कमी ८८.१३ टक्के इतका लागला आहे. मुंबई विभागाचा निकालही इतरांच्या तुलनेत कमी म्हणजे ९०.११ टक्के इतकाच लागला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.२६ टक्के इतका आहे.
नेहमीप्रमाणे यंदाही निकालामध्ये मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. एकूण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींची टक्केवारी ९४.२९ इतकी असून, विद्यार्थ्यांची टक्केवारी ८८.८० इतकी आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी खालीलप्रमाणे…
नागपूर – ९२.११
कोल्हापूर – ९२.१३
औरंगाबाद – ९१.७७
नाशिक – ८८.१३
पुणे – ९१.९६
कोकण – ९५.६८
लातूर – ९१.९३
मुंबई – ९०.११
अमरावती – ९२.५०
एकूण – ९१.२६
शाखांनुसार टक्केवारी पुढीलप्रमाणे…
विज्ञान – ९५.७२
वाणिज्य – ९१.६०
कला – ८६.३१
एमसीव्हीसी – ८९.३०
विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप ४ जूनला दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे. या वर्षी राज्यातून या परीक्षेसाठी साधारण १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थी बसले होते. राज्यातील २ हजार ३८९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना एक वाजल्यापासून मंडळाच्या खालील संकेतस्थळांवर निकाल पाहता येतील.
http://www.mahresult.nic.in
http://www.maharashtraeducation.com
http://www.hscresult.mkcl.org
http://www.rediff.com/exams
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा