राज्यात यंदाच्यावर्षी बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९०.०३ टक्के उत्तीर्ण झाल्याची माहिती सोमवारी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात आतापर्यंत बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून मंडळाच्या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.
पुन्हा एकदा मुलींची बाजी
उत्तीर्ण होण्यामध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक असण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. परीक्षेला बसलेल्या एकूण मुलींपैकी ९३.५० टक्के उत्तीर्ण झाल्या असून, मुलांबाबत हेच प्रमाण ८७.२३ टक्के इतके आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
कोकण विभागाने यंदा निकालामध्ये बाजी मारली असून, या विभागातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.
नाशिक – ८८.७१%
लातूर – ९०.६०%
नागपूर – ८९.०७%
कोकण – ९४.८५%
मुंबई – ८८.३०%
पुणे – ९०.७३%
औरंगाबाद – ९०.९८%
अमरावती – ९१.८५%
कोल्हापूर – ९१.५४%
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा