महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी (२ जून) दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येईल. राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सीबीएसई आणि आयसीएससीचे दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे राज्य मंडळाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत उत्सुकता वाढली होती. गेल्यावर्षी ३० मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता. साधारणपणे मे महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात बारावीचे निकाल राज्य मंडळाकडून जाहीर केले जातात. मात्र, यंदा मे महिन्याचा शेवटचा आठवडा संपायला आला तरी निकालाची तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे मंडळाकडे याबाबत सातत्याने विचारणा करण्यात येत होती. ५ जून रोजी निकाल जाहीर करण्यात येईल, असे मम्हाणे यांनी याआधीच स्पष्ट केले होते. गुरुवारी त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळ जाहीर केली. 

Story img Loader