लोणावळा परिसरात असलेल्या लोहगडावर हजारो पर्यटक अडकून बसले होते. रविवार असल्याने गडावर वर्षाविहार करण्यासाठी अनेक जण आल्याने प्रचंड गर्दी झाली होती. अक्षरशः पाऊल ठेवायला जागा देखील नसल्याचं एका व्हिडिओ मधून समोर आलेले आहे. सुदैवाने या घटनेत चेंगराचेंगरी झालेली नाही. असंच चित्र दरवर्षी बघायला मिळतं गडाच्या पायथ्याशी किंवा गडावरती योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर पोलीस देखील अशा ठिकाणी असणे गरजेचे असल्याचं बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोणावळा आणि मावळ परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू असून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे लोणावळा आणि मावळ परिसरामध्ये छोटे- मोठे धबधबे वाहू लागले आहेत. रविवारी वीकेंड असल्याने पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवडयासह पुणे जिल्ह्यातील पर्यटक वर्षाविहारासाठी लोणावळा, खंडाळा, लोहगड, भाजे या ठिकाणी आल्याचे बघायला मिळालं. लोहगडावरती प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र होतं. पर्यटकांना बाहेर निघण्यासाठी जागा नव्हती. तब्बल चार तास पर्यटकांना अडकून बसावं लागलं अशी परिस्थिती गडावरती निर्माण झाली. पाय ठेवायला देखील जागा शोधून सापडत नव्हती. अखेर सर्वांनी एकमेकांशी समन्वय साधत यातून मार्ग काढत पर्यटक गडाच्या खाली आले. असेच चित्र दरवर्षी लोहगडावरती बघायला मिळतं. नियोजनाचा अभाव या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला असून लोणावळा शहर असेल किंवा ग्रामीण पोलिस असेल यांनी अशा घटनांकडे लक्ष देण्याचं गरज आहे. अन्यथा चेंगराचेंगरी होऊन अनेकांचा जीव देखील जाऊ शकतो. पर्यटकांनी देखील शहाणपण दाखवण्याची गरज आहे. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी पर्यटकांनी जाणे टाळावे.