पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागातील रिक्त असलेल्या १११ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत ३ हजार ८९० उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यातील ६३५ उमेदवारांनी अर्ज भरला असून, त्यातील ४५७ उमेदवारांनी अर्जासह शुल्कही जमा केले आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी असल्याने अर्जसंख्या वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> राज्याला थंडीची प्रतिक्षाच; कोरड्या हवामानानंतरही अपेक्षित थंडी नाहीच

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी ही माहिती दिली. प्र-कुलगुरु डाॅ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे, परीक्षा व मूल्‍यमापन मंडळाचे संचालक डाॅ. महेश काकडे उपस्थित होते. येत्‍या १७ तारखेला होणाऱ्या विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभाची सविस्‍तर माहिती देण्यात आली. राज्यपाल रमेश बैस, माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत १७ जानेवारीला पदवीप्रदान समारंभ होणार आहे. या कार्यक्रमात १ लाख ५ हजार ६५४ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे, १५ सुवर्ण पदके प्रदान केली जाणार आहेत. त्यातील माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या नावाने असलेले सुवर्णपदक नाशिकच्या अशोक सेंटर फॉर बिझनेस अँड कम्प्युटर स्टडीजच्या रिद्धी कलंत्री, तर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत  येथील दादा पाटील  कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयीतल प्राजक्ता पठाडे यांना प्रदान केले जाणार आहे.

प्राध्यापक भरतीबाबत डाॅ. गोसावी म्हणाले, की बऱ्याच वर्षांत प्राध्यापक भरती झालेली नसल्याने विद्यापीठातील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त होत्या. आता १११ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेतून विद्यापीठाला गुणवत्ताधारक उमेदवार मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अध्यापनाबाबत असलेला ताण कमी होण्यासह येत्या काळात संशोधनाला गती मिळू शकणार आहे.

हेही वाचा >>> उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आहे, पण विद्यार्थीच मिळेनात; शिष्यवृत्तीचे निकष, नियमांमध्ये बदल करण्याची वेळ

प्रकाश जावडेकर यांच्या खासदार निधीतून विद्यापीठात वसतिगृह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खासदार प्रकाश जावडेकर यांच्‍या स्‍थानिक निधीतून एक मुलीचे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. महिनाभरात या वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. एकूण १४ मजली इमारत असून, त्‍यातील पहिल्‍या टप्‍प्‍यात ७ मजली इमारतीचे बांधकाम होणार आहे. या वसतिगृहात सुमारे एक हजार विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार आहे. प्रकाश जावेडकर यांच्‍या खासदार निधीतून ८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या वसतिगृहाचे काम येत्‍या दोन वर्षात पूर्ण होणार आहे. तसेच आणखी एक वसतिगृह प्रस्‍तावित असून, त्‍लव करत लवकरच काम सुरू केले जाणार असल्‍याचे ते म्‍हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge response to savitribai phule pune university professor recruitment pune print news ccp 14 zws
Show comments