लक्ष्मीपूजनानिमित्त रविवारी मंडई परिसरात फुले तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली. प्रथेप्रमाणे पूजनासाठी कीर्द, खतावण्यांची व्यापारी वर्गाकडून खरेदी करण्यात आले. मार्केट यार्डातील फूल बाजारात मोठ्या संख्येने नागरिक आल्याने सकाळी कोंडी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- पुणे: सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे सराफ बाजारात चैतन्य

लक्ष्मीपूजन आणि नरकचतुर्दशी सोमवारी (२४ ऑक्टोबर) आहे. लक्ष्मीपूजनासाठी मंडई परिसरातील हुतात्मा बाबू गेनू चाैक परिसरात फुले खरेदीसाठी सकाळपासून गर्दी झाली होती. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. मंडई परिसरात लाह्या, बत्तासे, उस तसेच लक्ष्मी (केरसुणी) विक्रेत्यांनी तात्पुरत्या स्वरुपात दुकाने थाटली होती. व्यापारी वर्गाकडून लक्ष्मीपूजनानिमित्त कीर्द, खतावण्यांचे पूजन करण्यात येते. प्रथेप्रमाणे बोहरी आळीतील व्यापाऱ्यांकडून कीर्द, खतावण्यांची खरेदी व्यापारी वर्गाकडून खरेदी करण्यात आली. मंडई परिसरात मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी आल्याने या भागातून चालणे देखील अवघड झाले होते. या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

हेही वाचा- पुणे: दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या; रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी

छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजारात लक्ष्मीपूजनानिमित्त पुणे, सातारा, सोलापूर परिसरातून फुलांची आवक झाली. परतीच्या पावसामुळे फुलांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या सुक्या फुलांना दर मिळाले. पावसामुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला असून बाजारात आवक झालेल्या ७० टक्के फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. फुले भिजल्याने डागाळली आहेत. झेंडू, गुलछडी, शेवंती, अष्टर या फुलांना चांगली मागणी राहिली, अशी माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

घाऊक बाजारात प्रतवारीवरनुसार एक किलो फुलांचे दर पुढीलप्रमाणे- झेंडू- ३० ते १०० रुपये, गुलछडी, २०० ते ३०० रुपये, अष्टर जुडी- ३० ते ५० रुपये, अष्टर सुट्टा- २०० ते ३०० रुपये, बिजली- १०० ते १५० रुपये, कापरी- २० ते ८० रुपये, शेवंती-६० ते २०० रुपये, जरबेरा- ३० ते ५० रुपये, कार्नेशियन- १२० ते १५० रुपये, शेवंती काडी-१५० ते २५० रुपये, लिलियम (१० काड्या)- ८०० ते १००० रुपये, ऑर्चिड- ४०० ते ५०० रुपये, ग्लाडिओ (१० काड्या)- ८० ते १५० रुपये.

हेही वाचा- पुणे: धुरामुळे होणारे प्रदूषण कमी करणाऱ्या फटाक्यांना मागणी

किरकोळ बाजारात झेंडू ७० ते १०० रुपये

लक्ष्मीपूजनासाठी झेंडुच्या मागणीत वाढ झाली. पावसामुळे झेंडू भिजलेला आहे. चांगल्या प्रतीच्या सुक्या झेंडुचे दर वाढले असून किरकोळ बाजारातील चांगल्या प्रतीच्या झेंडुची ७० ते १०० रुपये किलो दर मिळाला.

लक्ष्मी रस्त्यावर खरेदीची गर्दी

नरकचतुर्दशीनिमित्त नवीन कपडे खरेदी करण्याची प्रथा आहे. कपडे खरेदीसाठी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता परिसरात रविवारी खरेदीसाठी गर्दी झाली. गर्दीमुळे या भागातील वाहतूक विस्कळीत झाली.

क्रिकेट सामना संपल्यानंतर खरेदीसाठी गर्दी

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामान्यामुळे रविवारी दुपारी खरेदीसाठी गर्दी कमी होती. क्रिकेट सामना संपल्यानंतर सायंकाळी मध्यभागात खरेदीसाठी गर्दी झाली होती.