पुणे : बालभारती ते पौड फाटा दरम्यानच्या नियोजित रस्त्याला विरोध करणाऱ्यांचे मत आणि म्हणणे विचारात घेऊन त्यावर मार्ग काढून विकास कामे करावी लागतील. मात्र, ‘हम करे सो कायदा’, असे चालणार नाही, अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी रस्ता नकोच, अशी भूमिका घेणाऱ्यांना टोला लगावला.

प्रस्तावित बालभारती ते पौड फाटा रस्त्यावरून पर्यावरणवादी आणि महापालिका यांच्यात मतमतांतरे आहेत. वेताळ टेकडीवरून हा रस्ता जात आहे. त्यामुळे टेकडी धोक्यात येईल, असे काही संस्थांचे म्हणणे आहे. याविरोधात पर्यावरणवादी संस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी रस्ता तयार करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या रस्त्याला पर्यावरण प्रेमी नागरिकांचा विरोध वाढत असताना भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनीही नागरिकांना पाठिंबा देत हा प्रकल्प होऊ देणार नाही, असे जाहीर केले आहे.

Shatrughan Sinha on non-vegetarian food ban
Shatrughan Sinha: ‘संपूर्ण देशात मांसाहारावर बंदी घाला’, शत्रुघ्न सिन्हांच्या मागणीमुळे तृणमूल काँग्रेस अडचणीत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Pm Narendra Modi Speech in Rajayasabha
Pm Narendra Modi : “काँग्रेससाठी गाणं न म्हटल्याने किशोर कुमार यांना आकाशवाणीचे दरवाजे बंद” झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप
boricha marg Encroachment free news
मुंबई : चिंचपोकळी परिसरातील बोरीचा मार्ग अतिक्रमण मुक्त, पालिकेच्या जी दक्षिण विभागाची कारवाई
Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
road lines of Shilpata road blocked
शिळफाटा रस्ते बाधित शेतकऱ्यांचा ३०७ कोटीचा मोबदला रखडवला
Why hassle of Shaktipeeth Highway when there is viable alternative
सक्षम पर्याय असताना शक्तिपीठ महामार्गाचा अट्टहास कशासाठी?
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?

हेही वाचा – पुणे : दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ५० लाख सुवासिक फुलांची आरास

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, की प्रशासन हे त्यांच्या नियोजनानुसार काम करते. पण लोकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी पर्यावरणवादी नागरिकांशी संवाद साधणार आहे. लोकशाहीत ‘हम करे सो कायदा’ चालत नाही. सन १९८७ पासून हा विषय चर्चेत आहे, त्यामुळे डोक्यावर आभाळ पडले आहे. या पद्धतीने त्याची लगेच निविदा काढली पाहिजे, असे काही नाही. विकास करायचा असेल, तर पर्यावरणवाद्यांना समजावून का होईना पुढे जाण्यासाठी पर्याय नसतो. हा प्रकल्प कोणाच्या हितासाठी करण्यात येत आहे, असे नाही. हा रस्ता झाल्याने अनेकांना फायदा होईल.

हेही वाचा – वेताळ टेकडीवरील प्रकल्प रद्द करा; वेताळ टेकडी बचाव कृती समितीची पालकमंत्र्यांकडे मागणी

रस्त्याला शिवसेनेचाही विरोध

कोथरूडला जाण्यासाठी रस्ता हवा, अशी आमचीही मागणी आहे. मात्र, वेताळ टेकडी फोडून आणि पर्यावरणाचा ऱ्हास करून, पुणेकरांचे नुकसान होणार असल्याने आमचा या नियोजित रस्त्याला विरोध आहे. त्यामुळे वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या वतीने १५ एप्रिल रोजी करण्यात येणाऱ्या जनजागृती अभियानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सहभागी होणार असल्याचे महापालिकेतील या पक्षाचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी स्पष्ट केले.

Story img Loader