पिंपरी- चिंचवडमधील वाघजाई माता मित्र मंडळ यांनी गणेश मंडळांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. या मंडळाने गणपती मंडळाच्या लोकवर्गणीतून शिल्लक राहिलेल्या पैशातून शंभर दुचाकी चालकांना हेल्मेट दिले आहेत. त्यामुळे या मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही मूळ संकल्पना दिघी- आळंदी वाहतूक विभागाची होती. अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी दिली आहे. वाहतूक नियमांच्या अभावी तसेच विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा अपघात होऊन अनेक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे हेल्मेट हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. ते वाटप केल्याने दुचाकी चालकांकडून देखील समाधान व्यक्त होत आहे.
हेही वाचा >>> Ganesh Immersion: उद्योनगरीत जलाभिषेकात गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ
आज गणपती विसर्जन असून गणेशभक्त जड अंत:करणाने गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देत असून पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आहेत. अनेक गणपती मंडळ लोकवर्गणीतून डीजे लावून तसेच इतर गोष्टींवर वायफळ खर्च करतात. परंतु, दिघी येथील वाघजाई माता मित्र मंडळ यांनी गणपती मंडळाच्या शिल्लक वर्गणीतून गरजू १०० दुचाकी चालकांना हेल्मेट दिले असून एक वेगळा पायंडा पाडल्याच बघायला मिळालं. त्यांच्या या कृतीच पिंपरी- चिंचवड वाहतूक पोलीस तसेच नागरिकांकडून मोठं कौतुक होत आहे. मंडळाचे कार्यकर्ते दिघी वाहतूक पोलीस निरीक्षक नांदुरकर यांच्याकडे गेले होते. त्यांनी पोलिसांसाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर नांदुरकर यांनी दुचाकी चालकांना हेल्मेट द्या असं सांगितलं होतं. त्यामुळे या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपती वर्गणीतून शिल्लक रकमेतून १०० दुचाकी चालकांना हेल्मेट दिले आहे.