पिंपरी : चिंचवडमधून एक धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. कोर्टात पोटगीचा दावा दाखल केला म्हणून विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या गळ्याला कोयता लावून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत पीडितेच्या लघवीच्या जागी लिंबू पिळून हळदी कुंकू लावल्याचा घृणास्पद प्रकरण उजेडात आलं आहे. या प्रकरणी पीडित पत्नीने पतीच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचं आणि आरोपी पतीचं २००४ मध्ये विवाह झाला. पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. अनेक वर्षांच्या संसारानंतर हा वाद इतका चिघळला की त्याचे कौटुंबिक भांडण झाले. तक्रारदार महिला मुलासह विभक्त झाली. पीडित महिला १२ डिसेंबर २०२३ रोजी माहेरी निघून गेली. २०२४ मध्ये पीडित महिलेने पतीकडून पोटगी मिळावी यासाठी कौटुंबिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना पत्नी १ जून २०२४ रोजी पती राहत असलेल्या ठिकाणी साहित्य शिफ्टिंगसाठी गेली. काही साहित्य पार्किंग मध्ये आणले. तिथे पती आला तुला साहित्य मिळणार नाही. अस बदबडून तो फ्लॅटच्या आत निघून गेला.

मुलांची पुस्तकं आणि गादी राहिली असल्याने पीडित फ्लॅटमध्ये गेली. दारूच्या नशेत असलेल्या पतीने दरवाजा बंद करून कोयत्याच्या धाकावर जबरदस्तीने कपडे काढायला लावून शारीरिक संबंध ठेवले. अस तक्रारीत नमूद आहे. तुला घटस्फोट हवा आहे का? पोटगी हवी आहे का? अस म्हणत पत्नीच्या हाताला हळदी कुंकू लावले आणि एका लिंबाच्या चार फोडी करून पत्नीच्या लघवीच्या ठिकाणी पिळले. हे पाहून महिला घाबरली. मी तुझ्यावर जादूटोणा केला आहे. तुला वेड लागेल. हे प्रकरण कुणाला सांगितलं तर तुला जीवे मरेल अशी धमकी आरोपी पतीने दिली आहे. अखेर या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणी आरोपी मोकाट आहे.