लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: पत्नीने सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी १५ जणांच्या टोळक्याने पतीला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत चारचाकीचे नुकसान केले. ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री सव्वा एकच्या सुमारास माणगाव देवी मंदिरासमोर घडली.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
maharashtra vidhan sabha election 2024 Sanjay Puram vs Rajkumar Puram in Amgaon-Devari constituency
आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
prakash ambedkar dawood ibrahim
Prakash Ambedkar: “शरद पवार-दाऊद इब्राहिमच्या कथित भेटीची चौकशी करा”, प्रकाश आंबेडकरांची आरोपवजा मागणी

या प्रकरणी सचिन मच्छिंद्र आढाव (वय ३९, रा.गणेशनगर, डांगे चौक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवी बोडके, राज बहिरट, प्रदीप पारखी, सोन्या बोडके, सचिन बोडके (सर्व रा. माण, ता.मुळशी) यांच्यासह इतर १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… पुण्यातील ए आर रेहमान यांचा शो पोलिसांनी थांबवला; मंचावर येऊन अधिकाऱ्यांनी सुनावले खडेबोल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन आढाव यांच्या पत्नी सरपंच आहेत. त्यांच्या पत्नीने सरपंच पदाचा राजीनामा द्यावा यासाठी आरोपींनी फिर्यादीच्या चार चाकीवर सिमेंटचे ब्लॉक मारून नुकसान केले. तसेच डोक्यात ब्लॉक मारले. जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.