मटण न केल्याने दारु पिऊन घरी आलेल्या पतीने पत्नीच्य डोक्यात विळ्याने वार केल्याची घटना येरवड्यातील सुभाषनगर भागात घडली. भाग्यश्री संदीप मोरे (वय २९) असे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पती संदीप विष्णू मोरे (वय ३३, रा. सुभाषनगर, येरवडा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> दहावीचा निकाल उद्या
मोरेच्या पत्नीने याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी संदीप मोरे मध्यरात्री दोनच्या सुमारास दारु पिऊन घरी आला. मटण न केल्याने तो पत्नीवर चिडला. त्याने पत्नीसह आई-वडिलांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने पत्नीच्या डोक्यात मासे कापण्याच्या विळ्याने वार केला. गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहेत.