पुणे : गर्भवती पत्नीला पतीने बेदम मारहाण करून तिच्या पोटावर लाथ मारल्याने गर्भपात झाला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पतीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनील विनायक धारक (रा. शिंदवणे, लाेणी काळभोर) असे गुन्हा दाखल केलेल्या पतीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – महापारेषण कंपनीचे हिंजवडी उपकेंद्र सात वर्षांपासून धूळ खात पडून; दोषींवर कारवाईची सजग नागरिक मंचची मागणी

हेही वाचा – पिंपरी : टास्कच्या एका ‘रिव्हयुज’ला १५० रुपये देण्याच्या आमिषाने संगणक अभियंत्याची १३ लाखांची फसवणूक

याबाबत २३ वर्षीय पत्नीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धारक याची पत्नी गर्भवती आहे. कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. सुनीलने पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सुनीलने तिच्या पोटात लाथ मारली. मारहाणीत गर्भपात झाला. पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली. पत्नीला बेदम मारहाण करून गर्भपातास जबाबदार ठरल्याने पोलिसांनी आरोपी सुनीलच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक धायगुडे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband kick pregnant wife and abortion happen pune print news rbk 25 ssb