पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्राने भोसकून गॅलरीच्या दहाव्या मजल्यावरून ढकलून दिल्याची खळबळजनक घटना पिंपरी- चिंचवड शहरात घडली आहे. या घटनेत पत्नीच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पंकज शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. तर, निलेश अशोक जोर्वेकर अस खून करण्यात आलेल्या पत्नीच्या मित्राचे नाव आहे. या घटनेमुळं पिंपरी- चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा- पिंपरी : इन्स्टाग्रामवर निघाला पिस्तुल विकायला! सहकाऱ्यांसह रवानगी थेट तुरुंगात

Mumbai elderly woman murder news in marathi
सैफ अली खान हल्ल्यानंतर आता वांद्रे परिसरात वृद्ध महिलेची हत्या
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
nagpur married woman refued to have sex boyfriend killed her and raped her body
महिलेचा खून करुन मृतदेहावर बलात्कार… नागपुरात अमानवीय…
Gadchiroli crime news husband Electric shock sleeping wife
गडचिरोली : खळबळजनक! झोपलेल्या पत्नीला दिला विजेचा ‘शॉक’…
UP Murder Case
Alimony : पत्नीला पाच लाखांची पोटगी देणं टाळण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य, पत्नीला चंडी देवीच्या दर्शनाला नेलं अन् काढला काटा
Crime News
Navi Mumbai Crime : प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूचे वार करत केली हत्या, धक्कादायक घटनेने पनवेल हादरलं
Crime News in marathi
Crime News : २५ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर उलगडली छळाची आणि शोषणाची अंगावर काटा आणणारी कहाणी, कुठे घडली घटना?
Crime News
Crime News : पत्नीच्या विश्वासघाताने पती शॉक! आधी १० लाखांना किडनी विकायला तयार केलं, पैसे मिळताच पेंटरबरोबर झाली फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज शिंदे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. दोन दिवसांपूर्वी मी गावाला जात आहे. असं पत्नीला सांगून तो घराबाहेर पडला. याच दरम्यान, पंकजच्या पत्नीला मयत निलेश अशोक जोर्वेकर भेटायला आला. पंकजची पत्नी आणि मयत निलेश हे दोघे अत्यंत जवळचे मित्र होते. पंकज हा पत्नीवर पाळत ठेवून होता. तो एक दिवस अगोदरच गावावरून परत आला होता. तेव्हाच, निलेश आणि पत्नी हे दोघे त्यांच्या घरात गेले, त्या पाठोपाठ काही मिनिटांनी तिथं पंकज देखील पोहचला. पत्नी समोरच मित्र निलेश आणि पती पंकज यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. याच रागातून पंकजने धारदार शस्त्राने निलेशला भोसकले. या हल्ल्यात निलेश गंभीर जखमी झाला. एवढचं नाही तर पंकजने निलेशला राहत्या घराच्या दहा मजल्याच्या गॅलरीतून थेट खाली ढकलून दिल. यात, निलेशचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पंकजला अटक केली आहे.

Story img Loader