लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पिंपरी: प्रेयसीसोबत राहण्यासाठी पतीने प्रेयसीसमोरच पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केले. ही घटना खेड तालुक्यातील चिंबळी, बनकरवस्ती येथे मंगळवारी (दि.२५) दुपारी घडली.

याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार पती समीर लतिफ पठाण (वय २८) आणि त्याच्या प्रेयसीविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा- पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर विचित्र अपघात; १० पेक्षा जास्त वाहने एकमेकांना धडकली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर याला प्रेयसीसोबत एकत्र रहायचे होते. त्यामुळे समीर याने प्रेयसीसमोरच ‘आपण हिला मारुन टाकल्याशिवाय आपल्या दोघांना एकत्र राहता येणार नाही. आपण हिला संपवून टाकू’ असे म्हणत दोघांनी फिर्यादीचे पाय दोरीने बांधले. प्रेयसीने दोन्ही हात जोरात पकडले. समीर याने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केले. आळंदी पोलीस तपास करत आहेत. 