पुणे : त्रासाला कंटाळून विवाहितेने मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आय. पेरामल्ली यांनी पतीला दहा वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संतोष उर्फ नाना सुधाकर शिळीमकर (रा. वीरवाडी, ता. भोर, जि. पुणे) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष साधा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे. १६ जुलै २०१२ रोजी भोर तालुक्यातील वीरवाडी येथे ही घटना घडली.
हे ही वाचा…हिंजवडीत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या! राज्यात डोंबिवली, पनवेलमध्ये सर्वाधिक वाढ
पती संतोषच्या त्रासामुळे योगिता शिळीमकर (वय २५) यांनी मुलगी समृध्दी हिच्यासह कुंबळजाई मंदिराजवळील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली होती. योगिता यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून संतोष याला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. सररकार पक्षाकडून सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी बाजू मांडली. या खटल्यात आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. खटल्यात योगिता यांची आई, भाऊ आणि तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
© The Indian Express (P) Ltd