लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: कौटुंबिक कारणावरुन पत्नीला घराबाहेर काढल्यानंतर घरात राहिलेल्या धनादेश पुस्तिकेवर बनावट सही करुन बँक खात्यातून पाच लाख ८५ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!

या प्रकरणी पती प्रिन्स सतिश सधोत्रा, सासू सोनिया सतिश सधोत्रा, सासरे सतीश कुमार सधोत्रा, दीर पारस सधोत्रा, (सर्व रा. न्याती इथोस, उंड्री) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पत्नीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा… ‘पीएमआरडीए’चा रिंगरोड आता ‘मार्गावर’; पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि तिचे पती प्रिन्स सधोत्रा यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद होत होता. पती आणि नातेवाईकांनी तिला घरातून हाकलून दिले. पत्नी धनादेश पुस्तिका कपाटात विसरली होती. धनादेश पुस्तिकेवर पत्नीची बनावट सही करुन तिच्या बँक खात्यातून पाच लाख ८५ हजार रुपये काढून घेतले.

हेही वाचा… पुण्यात आज हेल्मेट सक्ती नाही; जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट संदेश

खात्यातून पैसे काढून घेण्यात आल्यानंतर पत्नीने विचारणा केली. तेव्हा तिला धमकावण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत.