लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात झोपड्यांना आग लागल्याची घटना बुधवारी घडली. आगीत सहा झोपड्या जळाल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील केदारेश्वनगर भागात पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या झोपड्यांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाचे चार बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीत झोपडीतील एक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. जवानांनी तत्परतेने झोपड्यांमधील सहा सिलिंडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला.

आणखी वाचा-पुण्यात मराठा आंदोलनकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे फाडले फ्लेक्स

पाण्याचा मारा करुन अर्धा तास आग आटोक्यात आली. आगीत सहा झोपड्या जळाल्या. झोपडीत गृहोपयोगी साहित्य जळाले. जवानांनी झोपडीत कोणी अडकले का नाही, याची खात्री केली. रहिवासी बाहेर पडल्याने अनर्थ टळला. आगीमागचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी समीर शेख, सचिन मांडवकर, सुनील नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ जवानांनी आग आटोक्यात आणली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huts fire in katraj area due to gas cylinder explosion pune print news rbk 25 mrj
Show comments