हैदराबाद येथे झालेले बॉम्बस्फोट व पुण्यात झालेले साखळी बॉम्बस्फोट यांच्यात असलेल्या साम्याचा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस)तपास केला जात आहे. महाराष्ट्र एटीएसचे एक पथक मदतीसाठी हैदराबादला पोहोचले आहे.
हैदराबाद येथे गुरूवारी रात्री दिलसुखनगर भागात झालेल्या स्फोटात दोन सायकल, आयईडीचा वापर करण्यात आला आहे. अशा पध्दतीचा अवलंब पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात करण्यात आला होता. या गुन्ह्य़ात अटक केलेल्या आरोपींनी दिलसुखनगर भागाची रियाज भटकळ याच्या सांगण्यावरून पुणे स्फोटाच्या अगोदर पंधरा दिवस टेहळणी केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पुणे बॉम्बस्फोट व हैदराबाद बॉम्बस्फोटातील साम्याचा तपास एटीएसकडून केला जात आहे. त्याचबरोबर दोन्ही बॉम्बस्फोटात काही िलक आहे का, याचा तपास केला जात आहे. हैदराबाद पोलीस व इतर तपास यंत्रणांशी आम्ही माहितीची देवाण-घेवाण करत आहोत,अशी माहिती एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
राज्याच्या एटीएसचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, आमचे एक पथक हैदराबादला गेले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा