लोणावळा: कोरोना काळात अनेकांना धीर देण्याची गरज होती. तो मी शरद पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून दिला. म्हणून मला मुन्नाभाई एमबीबीएस म्हणतात असं आमदार निलेश यांनी यांनी म्हटलं आहे. ते लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आज जो काही आहे तो केवळ शरद पवार यांच्यामुळे असल्याचे देखील त्यांनी अधोरेखित केले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह डॉक्टर्स सेलचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार निलेश लंके म्हणाले, मी डॉक्टर नसलो तरी मुन्नाभाई एमएमबीएस आहे. हो मला लोकं तसंच म्हणतात. कारण कोरोना काळात मी रुग्णांना हाताळत होतो. कोरोना सेंटरवर आलेल्या व्यक्तीला पहिल्यांदा मीच तपासायचो. मी डॉक्टर नाही, पण मी थोडा अभ्यास केला. प्रत्येक रुग्णाला आधार दिला. त्याचं दुःख दूर केलं. तिथं मनोरंजनात्मक उपचार केले. कारण मी कोरोना सेंटर नव्हतं तर शरद पवार आरोग्य मंदिर उभारलं होतं. रुग्णाच्या गळ्यात हात घातला की ८० वरील ऑक्सिज ९० वर जायचा. रात्री अपरात्री धीर देण्याचं काम केलं. पाच महिने शरद पवार आरोग्य मंदिर सुरू होतं. चार महिने मी तिथेच रुग्णांबरोबरच झोपत होतो. हे सर्व स्वतः ला झोकून दिल्याने झालं. कोविड सेंटरचं उदघाटन करून केवळ आदेश दिले नाहीत. असे त्यांनी म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am not a doctor but i am munnabhai mbbs says mla nilesh lanke kjp 91 mrj