राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फेरबदल करण्याचे पक्षश्रेष्ठींचे संकेत असावेत. म्हणूनच सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली. अर्थात या फेरबदलासंदर्भातील इत्थंभूत माहिती मला देखील नाही. त्यामुळे या विषयावर मी काही बोलू इच्छित नाही, असेही त्यांनी सांगितले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी मला काही माहिती नाही. कोणाला संघटनेमध्ये संधी द्यायची त्याचप्रमाणे नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करण्याचे धोरण असू शकेल. तर, काहींना लोकसभा निवडणुकीमध्ये संधी मिळणार असेल. मला यासंदर्भातील इत्थंभूत माहिती नाही. त्यामुळे या विषयावर मी काही बोलू इच्छित नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करणारा मी कार्यकर्ता आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजीनामे ही नौटंकी असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली असल्याकडे लक्ष वेधले असता अजित पवार म्हणाले, लोकशाहीमध्ये काम करताना कोणाकडे कोणती जबाबदारी द्यायची, याचा निर्णय ५० वर्षांचा राजकीय अनुभव असलेले नेतृत्व घेत असते. ते जो निर्णय घेतील तो पक्षहिताचाच असेल.
राष्ट्रवादीमध्ये फेरबदल करण्याचे पक्षश्रेष्ठींचे संकेत असावेत – अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फेरबदल करण्याचे पक्षश्रेष्ठींचे संकेत असावेत. म्हणूनच सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली.
First published on: 09-06-2013 at 02:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I dont know what high commend thinking ajit pawar