– सागर कासार

सध्या संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असली तरीही करोनावर मात करुन घरी परतणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही आश्वासक वाढ होते आहे. करोनावर मात करुन घरी परतणाऱ्या लोकांचं विविध पद्धतीने स्वागत होताना सोशल मीडियावर व्हिडीओ आपण पाहत असतो. सध्या सोशल मीडियावर पुण्याच्या सलोनी सातपुते या तरुणीचा आपल्या बहिणीचं जंगी स्वागत करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. आजुबाजूला खडतर वातावरण, घरातील पाच सदस्यांना करोनाची लागण अशा परिस्थितीतही संकटाशी हसतमुखाने सामना करण्याच्या सलोनीच्या सेलिब्रेशनला नेटकऱ्यांनीही दाद दिली. मात्र करोनाबाधित रुग्णांच्या परिवाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलावा अशी भावना सलोनीने लोकसत्ता.कॉम सोबत बोलताना व्यक्त केली.

nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Marathi actress Pooja Sawant parents visit their new home in Australia for the first time
Video: पूजा सावंतच्या आई-बाबांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील नव्या घराला दिली भेट, लेकीचं प्रशस्त घर पाहून होती ‘ही’ प्रतिक्रिया
Image of Allahabad High Court
“पत्नीने अनैतिक संबंध न ठेवता इतरांना भेटणं म्हणजे…”, २३ वर्षांपासून वेगळं राहणार्‍या पती-पत्नीला घटस्फोट देताना न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
rajesh mapuskar rohan mapuskar
‘व्हेंटिलेटर’ फेम दिग्दर्शकाच्या मराठी सिनेमाची घोषणा, कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर करणार पदार्पण

अवश्य वाचा – Viral Video : करोनावर मात करुन आलेल्या बहिणीचं दणक्यात स्वागत

पुण्याच्या धनकवडी भागातील आंबेगाव पठार भागात सलोनी आपल्या परिवारासह राहते. सलोनीचा अपवाद वगळता कुटुंबातील पाचही जणांना करोनाची लागण झाली होती. पाचही जणांवर रुग्णालयात उपचार होत असताना, सलोनीला घरात एकटं रहावं लागलं. साहजिकच घरात एकटी असल्यामुळे सलोनीला प्रचंड त्रास होत होता. परंतु अशावेळी शेजारच्या लोकांनी आपल्याला दिलेली वागणूक सलोनीला जास्त खटकली. नेहमी आजुबाजूचे बोलणारे लोकही या काळात सलोनीशी बोलत नव्हते किंवा तिला ओळख दाखवत नव्हते. अशावेळी पूर्णपणे खचून जायला होतं. त्या काळात मला आजुबाजूच्या लोकांकडून मानसिक आधाराची गरज होती, पण दुर्दैवाने असं झालं नाही, लोकसत्ता.कॉमशी बोलताना सलोनीने आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली.

सलोनीच्या घरातील एकापाठोपाठ एक सदस्यांचे करोना अहवाल पॉजिटीव्ह आले. त्यानंतर सलोनीने स्वतःला होम क्वारंटाइन केलं. आतापर्यंत मी घरात कधीच एकटी राहत नव्हते त्यामुळे मला कमालीचा एकटेपणा जाणवत होता. घरातली सर्व कामं तासाभरात आटपायची…त्यानंतर मी बाहेर जाऊन बसायचे. माझ्या घराजवळून जाणारी लोकं, जी नेहमी माझ्याशी गप्पा मारायची…माझी खुशाली विचारायची तीच लोकं त्या काळात मान खाली घालून माझ्याशी न बोलता पुढे जायची. असा एकटेपणा कोणाच्याही वाटेला येऊ नये. बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा असं मत सलोनीने यावेळी बोलताना मांडलं. या काळात योग आणि वाचनात स्वतःचं मन रमवत सलोनीने आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राखलं.

हळुहळु सलोनीच्या कुटुबांतील सर्वांनी करोनावर मात केली. आई-बाबा, आजी-आजोबा घरी परतल्यानंतर मला जरा आधार मिळाला. बहिण ज्या दिवशी घरी येणार असं समजलं त्यादिवशी तिचं स्वागत करायचं मी ठरवलं होतं. खरतर डान्स करायचा असं मी ठरवलं नव्हतं. पण बहिणीला समोर पाहिल्यानंतर मला राहवलं नाही आणि इतक्या दिवसांचा तणाव मी डान्सच्या माध्यमातून मोकळा केला असं सलोनीने सांगितलं. सलोनीची बहिण स्नेहलनेही आपलं अशा पद्धतीने स्वागत होईल असं वाटलं नव्हतं अशी भावना व्यक्त केली.

Story img Loader