आगामी काळात अजित पवारांनी मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावे अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे. अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तशा आशयाच्या शुभेच्छा संदेश देणारा केक कार्यकर्त्यांनी तयार केला होता. पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांना शहरातील कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देत हा वाढदिवसाचा केक दिला आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी तो कापला, कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. या अनोख्या शुभेच्छा संदेशामुळे हा केक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
हे ही वाचा… अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या ‘त्या’ सूचनेचे केले कौतुक
अजित पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये आज म्हणजे रविवारी सकाळपासून सात वाजल्यापासून विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. काळेवाडी येथील एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा असून यादरम्यान ते पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. काही तासांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पिंपरीत मेळावा पार पडला. आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडत आहे. अजित पवार हे आगामी काळात मुख्यमंत्री होतील अशी आशा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आहे.
© IE Online Media Services (P) Ltd