पुणे : जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशिक्षणार्थी म्हणून IAS पूजा खेडकर होत्या. मात्र त्यांची काही दिवसांची कारकीर्द ही वादग्रस्त ठरली असून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवल्यानंतर त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली. आयएएसमध्ये निवड होण्यापूर्वी सादर केलेल्या कागदपत्रांवरूनही वाद निर्माण झाला आहे. चुकीची कागदपत्र सादर केल्याचा आरोप असून त्याची चौकशी चालू आहे.

त्या सर्व घडामोडी दरम्यान पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेतेवेळी पिस्तूल रोखणे आणि मारहाण प्रकरणी पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा खेडकर यांच्याकडे पिस्तूलचा अधिकृत परवाना असल्यामुळे पिस्तुलाचा परवाना रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ganja ulhasnagar court case
उल्हासनगर न्यायालयात चपलांच्या खोक्यातून गांजा पुरवण्याचा प्रकार; अज्ञात आरोपीचे न्यायालयाच्या खिडकीतून उडी घेत पलायन
Kalyan citizens beat youths who molested a girl
कल्याणमध्ये चिंचपाडा येथे मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नागरिकांचा चोप
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल होणार का? विचारताच पोलीस अधीक्षकांचं उत्तर; म्हणाले, “मी…”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार

हेही वाचा : Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार जप्त, कागदपत्र सादर करण्याचे निर्देश; एवढ्या रुपयांचा दंडही ठोठावला!

तुम्ही शस्त्राचा दुरुपयोग करून परवाना विषयक अटी आणि शर्ती चा भंग केला आहे. त्यामुळे तुम्ही शस्त्र परवाना धारण करण्यास योग्य व्यक्ती नाही. त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना का रद्द करण्यात येऊ नये, याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असून येत्या १० दिवसांत लेखी स्वरुपात आपलं म्हणणं मांडावे, तुम्ही नोटीसला उत्तर न दिल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशा आशयाचा मजकूर असलेली नोटीस मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याच्या भिंतीवर पुणे पोलिसांनी चिकटवली आहे.

Story img Loader