पुण्यातील क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्व कपाची पुण्यात थाटामाटात मिरवणूक निघणार आहे. इतकंच नाही, तर या वर्ल्ड कपबरोबर फोटो काढण्याचीही संधी मिळणार आहे. याबाबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी माहिती दिली. तसेच नागरिकांना हा विश्व कप अभिमानाने मिरवण्याचं आवाहन केलं.

रोहित पवार म्हणाले, “आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफीचा मी पुण्यात काढलेला आजचा हा पहिला फोटो आहे. असाच फोटो तुम्हीही काढू शकता! त्यासाठी देशात प्रथमच आज दुपारी १ वाजता हॉटेल जेडब्ल्यू मेरिएटपासून सेनापती बापट रोड – सिम्बॉयसिस कॉलेज – बीएमसीसी – फर्ग्युसन रस्ता ते कृषी महाविद्यालय या मार्गावरून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत सहभागी व्हायला विसरू नका.”

हेही वाचा : आयसीसीने T20 World Cup स्पर्धेची ठिकाणं केली जाहीर, १० मैदानांवर खेळवले जाणार ५५ सामने

“तसंच कृषी महाविद्यालयात सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ही ट्रॉफी ठेवण्यात येणार आहे. ती बघायलाही जरूर या. चला पुण्यात अभिमानाने आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफी मिरवूया,” असंही रोहित पवारांनी नमूद केलं.

Story img Loader