पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला गणेश भक्तांकडून दररोज अनेक वस्तु अर्पण केल्या जाताता. पण शनिवारी एका भक्ताने तब्बल १२७ लिटर दुधापासून तयार करण्यात आलेला आईस्क्रीमचा मोदक अर्पण केला. हा आईस्क्रीमचा मोदक पाहण्यास भाविकांनी एकच गर्दी केली आहे. किगा आईस्क्रीम सेंटरचे गणेश गोसावी यांनी हा मोदक अर्पण केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, “आमच्या संपूर्ण टीमने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी यंदा आईस्क्रीमचा मोदक अर्पण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आम्ही त्याप्रमाणे तयारीला सुरुवात केली होती. हा आईस्क्रीमचा मोदक तयार करण्यास २५ दिवसांचा कालावधी लागला. यासाठी एकूण १२७ लिटर दूध वापरण्यात आले. तसंच हा मोदक बनवताना विशिष्ट तापमानात आईस्क्रीमचा मोदक बनवणे हे खूप आव्हानात्मक होते”.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१९ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ice cream modak at pune dagdusheth ganpati sgy