लोकसत्ता वार्ताहर

शिरुर : कचऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदल्यास कचरा हा धन कचरा बनू शकतो असे सांगून कचरा व्यवस्थापना संदर्भात कणखर व स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक असल्याचे वेंगुर्लाच्या स्वच्छता पॅटर्नचे जनक व संगमनेरचे मुख्याधिकारी रामदास कोकरे शिरुर येथे म्हणाले.

शिरुर येथील सनशाईन क्लबच्या वतीने ‘कचरा समस्या व स्वच्छता अभियान’ या विषयावर व्याख्यान झाले. या वेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष व सनशाईन क्लबचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, कर्नल महेश शेळके, अभिनेते व दिग्दर्शक भाउराव कऱ्हाडे, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, नायब तहदिलदार आकाश किसवे, कृषिलोक विकास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक, आदी उपस्थित होते .

कोकरे यांनी कोकणातील वेंगुर्ले शहराचा स्वचछतेचा प्रवास आपल्या व्याख्यानातून उलगडला. कचरातून, खत निर्मिती, वीज निर्मिती होऊन कचरातून उत्प्नन निर्माण होवू शकते. कचराचा प्रत्येक घटकाला किमंत असून कचऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा असे ते म्हणाले.

कचऱ्याची समस्या ही जागतिक असली तरी ती सोडविण्यासाठी स्वंत :पासून सुरुवात करणे गरजेचे आहे. कचराच्या समस्येवर उपाय शोधून त्यातून उत्पन्नाची साधने निर्माण केली पाहिजेत. कचरा बाबत साक्षर होणे म्हणजे उघड्यावर कचरा टाकू नये, प्लॅस्टिकचा वापर टाळणे व कचराचे वर्गीकरण करणे असे कोकरे म्हणाले .

कचरा व्यवस्थापनात लोकसहभाग व इच्छशक्ति महत्वाची आहे. वेंगुर्ला शहरात लोकसहभागातून जागतिक घनकचरा व्यवस्थापनाची सक्सेस स्टोरी घडली. स्वच्छतेचा वेंगुर्ला पॅटर्न संदर्भात वॅशिग्टन पोस्ट मध्ये वृत्त प्रसिध्द झाले असून या पॅटर्नचा एनसीआरटी, स्टेट बोर्ड व सीबीएससीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्याच बरोबर वेंगुर्ले शहरातील स्वच्छतेचा केलेल्या कामाचा सन्मान या शहरातील रस्त्यास रामदास कोकरे यांचे नाव देवून करण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले वेंगुर्ला, कर्जत, माथेरान, कल्याण डोंबविली, लातुर जिल्ह्यातील नगरपरिषद, संगमनेर येथील स्वच्छते संदर्भातील कामे त्यात आलेल्या अडचणी त्यावर केलेल्या विविध कल्पक उपाययोजना, काही प्रसंगी पत्करावा लागलेल्या रोष, मिळालेल्या लोकसहभाग, झालेले सन्मान हा सर्व प्रवास त्यांनी व्याख्यानातून मांडला. स्वच्छतेचा कामासंदर्भात प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दोन वेळ्या आपली मुलाखत घेतल्याचे ही कोकरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोरराजे निंबाळकर यांनी कचराची वाढत्या समस्ये बाबत भाष्य करीत या समस्येला सामोरे जात असताना करावयाचा उपाययोजना याबाबत भाष्य करुन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या स्वच्छता अभियानातील विशेष योगदानाबद्दल प्रंशसा केली.

सुत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांनी मानले. यावेळी वसुंधरा अभियनात बक्षिस मिळविल्याबद्दल शिरुर नगरपरिषदेचे कार्यलयीन अधीक्षक राहूल पिसाळ , स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे , प्राची वाखारे यांचा व महाराष्ट्र शासनाचा वतीने नूकतेच सन्मानित करण्यात आलेले रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला .

Story img Loader