पिंपरी-चिंचवड: ठाकरे गटाचे बंडखोर नेते राहुल कलाटे हे शिवसेना (शिंदे गटाच्या) वाटेवर आहेत. कलाटे यांनी रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राहुल कलाटे हे ठाकरे गटातून गेले तरी पक्षाला तीळमात्र आणि काडीचादेखील फरक पडणार नाही असं ठाकरे गटाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन भोसले म्हणाले. उद्धव ठाकरे यांचा आदेश झुगारून चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक कलाटे यांनी लढवली असल्याचा दाखला देखील यावेळी भोसले यांनी दिला.

सचिन भोसले म्हणाले, सर्वप्रथम राहुल कलाटे यांनी अधिकृतरित्या शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय की नाही हे अस्पष्ट आहे. कारण त्यांनी फक्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या विचारांनी काम करण्याचे मीडियाशी बोलताना सांगितलेलं आहे. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर तीळमात्र आणि काडीमात्रदेखील फरक पडणार नाही. राहुल कलाटे यांचं संघटनात्मक बांधणीमध्ये योगदान नाही. उद्धव ठाकरे यांचा आदेश झुगारून चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीला ते सामोरे गेले आणि त्यांचे डिपॉझिट जप्त झालं. त्यामुळे संघटनेवर कुठलाही परिणाम होणार नाही.

Nagpur strength of uddhav Thackeray shivsena
शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Eknath Shinde Group , Pratap Sarnaik,
स्बळाच्या नाऱ्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टिकेचे बाण
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Vaibhav Naik On Rajan Salvi
Vaibhav Naik : “मला आणि राजन साळवींना शिंदे गटाकडून…”, वैभव नाईक यांचा मोठा गौप्यस्फोट

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस, सुमित मलिक आणि सुवेझ हक यांची उलटतपासणी घ्या; प्रकाश आंबेडकर यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे मागणी

हेही वाचा – पुणे : फलक काढताना विजेचा धक्का बसून १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

राहुल कलाटे हे अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभेसाठी राहुल कलाटे हे राष्ट्रवादीकडून लढणार होते. तसे त्यांनी संकेतदेखील दिले होते. मात्र ऐनवेळी राहुल कलाटे यांना अपक्ष उमेदवारीवर चिंचवड विधानसभा निवडणूक लढवावी लागली. त्यांनी भरघोस मतंदेखील घेतली. तरी त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. तेच राहुल कलाटे आता शिवसेना शिंदे गटाच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.

Story img Loader