राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विधान सभेचे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार आपल्या खुमासदार शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. ते त्यांच्या ठसकेबाज गावरान बोलीभाषेत विरोधकांना प्रत्युत्तर देत असतात. त्यामुळे त्यांची अनेक वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होतात. एवढंच नव्हे तर त्याच्या ठळक मथळ्यात बातम्याही प्रसिद्ध होतात. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं. त्यांच्या याच खुमासदार शैलीवरून आज त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी त्याच हटके पद्धतीने प्रत्युत्तर दिलं आहे. ते सकाळ या वृत्तस्थळाने आयोजित केलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“तुमची ही पूर्वीपासूनच भाषा आहे का?” असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, “माझी ही भाषा पहिल्यापासून नाही. परंतु, आम्हाला तशी भाषा वापरण्याकरता प्रवृत्त केलं जातं. पुरंदरमध्ये सुप्रिया सुळ आणि आमचे दैवत शरद पवारांबाबत खालच्या पातळीर जाऊन विजय शिवतारे टीका करायचे. पवारांसाहेबांवर टीका करणे म्हणजे सूर्यावर बघून स्वतःच्या अंगावर येईल थुंकी असं आहे. सुप्रियासुद्धा उत्तम संसदपटू आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न ती संसदेत मांडते. असं असतानाही महाराष्ट्राची संस्कृती आहे. महाराष्ट्राला यशवंतरावांनी काही विचार दिले आहेत. त्यानुसार, महिलांकडे बघण्याचा, त्यांच्याबाबत बोलण्याचा, भाषेबाबत काही तारतम्य बाळगा ना. जर कुणाला मस्ती आली, तर ती मस्ती जिरवण्याची ताकद आपल्यात आहे”, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> “एका नेत्याच्या पत्नीनं तेव्हा सांगितलं की माझे पती कित्येक वेळा…”, अजित पवारांची फडणवीसांवर अप्रत्यक्ष टोलेबाजी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले अजित पवार?

“महाराष्ट्रात झालेला सत्ताबदल हा अचानक घडलेला नव्हता. अनेकदा इथं काही जण मी नावं घेत नाही पण ते साक्षीदार पण एकनाथ शिंदेबाबत कानावर यायचं. ते नाराज झाले होते. त्यांच्या मनात काही वेगळं शिजत होतं हे आम्हाला समजत होतं. आम्ही हे शरद पवारांना सांगितलं. आम्ही हे उद्धव ठाकरेंना सांगितलं. उद्धवजी म्हणायचे की ठीक आहे मी त्यांच्याशी बोलतो. पवारसाहेबही त्यांच्याशी बोलले. एखाद्याच्या मनात जर वेगळं काही चाललं असेल आणि तुम्ही त्याला विचारलं की काय रे काही गडबड आहे का तर तो म्हणणार आहे का? की माझ्या मनात गडबड आहे? ते म्हणणारच ना गावाकडे आलो आहे, शेती करतोय असंच एकनाथ शिंदे सांगायचे.