पिंपरी: पारपत्र आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतरही एका बांगलादेशी व्यक्तीने देशात वास्तव्य केले. तसेच त्याने बनावट भारतीय आधारकार्ड, मतदान कार्ड आणि पॅनकार्ड तयार करून त्यांच्या छायांकित प्रती काढल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी जुनी सांगवी येथे त्याला अटक केली.
हेही वाचा >>> अमेरिकन पोलिसांकडून पुण्यातील तरुणीची सुटका; प्रेमविवाहानंतर धर्मांतर करण्यासाठी दबाव
कालीपाडा विनोदचंद्र सरकार (वय ३५, रा. मधुबन कॉलनी, जुनी सांगवी, मूळ – रतनपूर, वीरामपुरथाना, जि. दिनाजपूर, बांगलादेश) असे अटक केलेल्या बांगलादेशीचे नाव आहे. पोलीस शिपाई प्रफुल्ल शेंडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कालीपाडा हा मूळचा बांगलादेशचा आहे. त्याची पारपत्र आणि व्हिसाची वैधता संपलेली असताना देखील त्याने भारतात वास्तव्य केले. तसेच बनावट भारतीय आधारकार्ड, मतदान कार्ड आणि पॅनकार्ड तयार केले. त्याच्या छायांकित प्रती काढल्याचे आढळून आले. हा प्रकार पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाच्या निदर्शनास आला. त्यानुसार, पोलिसांनी त्याला अटक केली.