औद्योगिक वसाहत असलेल्या चाकणमध्ये अवैद्य धंदे फोफावले असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. चाकणच्या तळेगाव चौकात रस्त्यालगत असलेल्या खोलीत अवैद्य धंदे सुरू असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे चाकण पोलिसांचा अवैध धंद्यांवर अंकुश नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ चाकण येथील असल्याचं स्पष्ट झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चाकणच औद्योगिक वसाहत म्हणून देशभर नावलौकिक आहे. देशभरासह इतर देशातील मोठ-मोठ्या आणि नामांकित कंपनी याच परिसरात आहेत. यामुळे महाराष्ट्रासह देशभरातून कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. सर्वसामान्य आणि गरीब वर्गातून आलेल्या कामगार या अवैद्य धंद्यांचा शिकार बनत आहेत. चाकणच्या तळेगाव चौकात एका खोलीत अवैद्य धंदे म्हणजेच मटका सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून तो चाकणचा असल्याचं उघड झाल आहे.

हेही वाचा – बंगळुरूतील रामेश्वरम कॅफे बाॅम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी पुण्याच्या दिशेने? एनआयएकडून तपास सुरू

हेही वाचा – ‘सीटीईटी’ची तारीख जाहीर, अर्ज प्रक्रियाही सुरू

चाकण वाहतूक पोलीस चौकीच्या अगदी पाठीमागे हा गोरख धंदा सुरू आहे. चाकणच्या चौकात सर्रास पोलीस असतात. मात्र, या अवैध धंद्याकडे पोलीस सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच, म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. यावर पोलीस काय कारवाई करतात हे बघावं लागेल.