पिंपरी : शहरातील होर्डिंगधारकांकडून पुन्हा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे होर्डिंगधारकांनी नियमांचे पालन करावे. एखादी दुर्घटना घडल्यास संबंधित होर्डिंगधारकांना आणि संबंधित संस्थेला जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवड : लिव्ह इन रिलेशनमधील प्रेयसीची हत्या; मुलाला सोडलं आळंदीत बेवारस

पिंपरी-चिंचवड शहरातील किवळे येथे १७ एप्रिल २०२३ रोजी अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच मजुरांचा मृत्यू झाला होता. या दुघर्टनेनंतर महापालिकेने शहरातील १७४ अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त केले. शहरात सद्यस्थितीत सुमारे १३०० होर्डिंग अधिकृत असल्याचा दावा महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाचा आहे. महापालिकेने मागील पाच वर्षांत दोन वेळा बाह्य जाहिरात धोरण तयार केले होते. त्याची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली. मात्र, ९ मे २०२२ मधील राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार नवे धोरण स्वीकारण्यात आले. महापालिकेचे पूर्वीचे धोरण रद्द करण्यात आले. किवळे दुर्घटनेनंतर प्रशासनाने होर्डिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. असे असले तरी होर्डिंगधारकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेने कारवाईचा इशारा दिला आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या; प्रेयसीसह योगा प्रशिक्षकाविरोधात गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परवानगीसाठी ४० अर्ज

शहरात १३०० जाहिरात होर्डिंग अधिकृत आहेत. नव्याने पुन्हा ४० होर्डिंग उभारण्यासाठी आकाश चिन्ह व परवाना विभागाकडे अर्ज आले आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत नवीन फलकांना परवानगी देण्यात आली नव्हती. आता आचारसंहिता संपल्यामुळे नियमानुसार होर्डिंगला परवानगी दिली जाणार आहे. होर्डिंगधारकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दुर्घटना घडू नये, यासाठी होर्डिंगधारकांनी नियमांचे पालन करावे. त्यानंतरही दुर्घटना घडल्यास संबंधित होर्डिंगधारक आणि जाहिरात संस्थेला जबाबदार धरण्यात येईल. नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी दिला.