जिल्ह्यात बेकायदा गौणखनिज उत्खनन, वाळू उपसा आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाकडून नगण्य दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ही बाब जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या आकडे – वारीवरूनच स्पष्ट झाली आहे. तसेच, केलेल्या कारवायांमध्ये संबंधितांना किरकोळ दंड आकारण्यात आला असून चालू आर्थिक वर्षात अवैध उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी संबंधितांना १७ कोटी १५ लाखांचा दंड आकारण्यात आला, मात्र प्रत्यक्षात केवळ ६९ लाख २१ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच ८८ प्रकरणांत एकाही व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

हेही वाचा : विश्लेषण: ‘डेड बॉल’वरुन पाकिस्तानची रडारडी; पण ‘डेड बॉल’ म्हणजे नेमकं काय? तो कधी घोषित करतात? विराटच्या तीन धावा ग्राह्य का धरल्या?

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

शहरात विविध प्रकल्पांसाठी, तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गौणखनिज उत्खनन होत आहे. मावळ, मुळशी, दौंड, शिरूर आणि इंदापूर अशा विविध तालुक्यांत महसूल विभागाने चालू आर्थिक वर्षात ८८ प्रकरणांची नोंद केली आहे. त्यामध्ये वाळू, मुरूम, माती, दगड आमि अन्य खनिज (सिलीका, लॅट्रेराईट व इतर) यांची अवैध वाहतूक, उत्खनन यांचा समावेश आहे. वाळूची १९, मुरूम ३२, माती ३४, दगड तीन अशी ८८ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. या प्रकरणांत संबंधितांना १७ कोटी १५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ ६९ लाख २१ हजार रुपयांची वसुली करण्यात जिल्हा खनिकर्म विभागाला यश मिळाले आहे. तसेच अवैध वाहतुकीसाठी ३४ वाहने जप्त करण्यात आली आहेत, तर अवैध उत्खननासाठी वापरण्यात आलेली एकही यंत्रसामुग्री जप्त करण्यात आलेली नाही.

हेही वाचा : पिंपरी: टाटा मोटर्स कंपनीतील कामगारांचा बोनसचा तिढा सुटेना

परिणामी संबंधितांना कारवाईचा धाक राहिलेला नाही. अनेक ठिकाणी कारवाई होऊनही बेकायदा उत्खनन सुरू असल्याचेही निदर्शनास आले आहे.दरम्यान, पुण्याचा चहूबाजूने विकास होत असून नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अवैध उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असूनही जिल्हा खनिकर्म विभागाकडून नगण्य कारवाई होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

अवैध उत्खननाचा आढावा

गौणखनिज प्रकार अवैध उत्खनन प्रकरणे
वाळू- १९
मुरूम -३२
माती -३४
दगड -३
अन्य खनिज : 0

एकूण : ८८