पुणे : कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरचा बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेनंतर देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थिनी आणि महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) राष्ट्रीय अध्यक्ष आर.व्ही.अशोकन यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांना पत्र लिहून देशभरातील रुग्णालये संरक्षित क्षेत्र जाहीर करण्याची मागणी केली आहे.

कोलकत्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर आयएमएने पत्र पाठवून विद्यार्थिनी आणि महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला आहे. या पत्रात म्हटले आहे की, विमानतळे ही संरक्षित क्षेत्रे असतात. तिथे त्रिस्तरीय सुरक्षा असते. रुग्णालयांच्या बाबतीत मात्र असे घडत नाहीत. विमान कंपन्यांचे कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि त्यांच्या कामकाजात अडथळा आणल्यास कारवाई केली जाते. डॉक्टर आणि रुग्णालयांच्या बाबतीत मात्र असे घडत नाही. त्यामुळे रुग्णालये ही संरक्षित क्षेत्र जाहीर करावीत. यासाठी सरकारने कायदा करावा.

old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!

हेही वाचा >>> विधानसभा निवडणूक लढविणार का, पार्थ पवार म्हणतात, ‘मला आमदार, खासदार’…

देशातील डॉक्टरांनी गेल्या काही दशकांपासून हिंसाचाराचा त्रास होत आहे. त्यांना अनेक वेळा हिंसाचाराला सामोरे जावे लागते. यातून वैद्यकीय व्यवसायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालयातील खराब वातावरण, कामाचा अतिरिक्त बोजा आणि हिंसाचार हे डॉक्टरांसाठी वास्तव बनले आहे. डॉक्टरांच्या समस्या दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. डॉक्टर तरूणीचा मत्यू पहिला आणि शेवटचा नसला तरी या निमित्ताने पावले उचलण्याची वेळ निर्माण झाली आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : बडतर्फ आयएएस पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांच्या कंपनीचा लिलाव…

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मागण्या

– देशभरातील रुग्णालये संरक्षित क्षेत्रे जाहीर करा.

– सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये पोलीस बंदोबस्त असावा.

– खासगी रुग्णालयांनीही पर्यायी सुरक्षा यंत्रणा नेमावी.

– रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे बंधनकारक करावे. – आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी विशेष कायदा करावा.