पुणे : गोवा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर परिसरात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडे राहण्याचा आणि किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीच्या नजीक वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गोवा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर परिसरातील हवेत बाष्पाचे प्रमाण वाढून हवा दमट झाली आहे. त्यामुळे या परिसरात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडे राहून किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>> मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गहुंजे क्रिकेट मैदान परिसराला छावणीचे स्वरूप

किमान तापमानात वाढ मंगळवारी जळगावात ११.० अंश सेल्सिअस सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक १६.७, महाबळेश्वर १६.५, सोलापूर १८.०, औरंगाबाद १४.० आणि नागपुरात १७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यभरात किमान तापमानात वाढीचा कल आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd predicts light rainfall in goa sindhudurg and kolhapur pune print news dbj 20 zws
Show comments