पुणे : विदर्भ आणि मराठवाड्यावर पुन्हा अवकाळीचे ढग जमा झाले आहेत. शनिवारपासून पुढील पाच दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या एक पश्चिमी विक्षोप (थंड हवेचा झंझावात) हिमालयीन परिसरात सक्रिय आहे.

हेही वाचा >>> उसाला आजवरची उच्चांकी एफआरपी मिळणार ? जाणून पंतप्रधान मोदींनी कारखान्यांना काय आदेश दिले

principle of secularism essential for democracy prosperity supreme court justice abhay oak
लोकशाहीच्या समृद्धीसाठी धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व गरजेचे ; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचे प्रतिपादन
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच…
Our formula is called coordination and understanding Chandrakant Patil
समन्वय नावाचा आणि समजूतदारपणाचा आमचा फॉर्म्युला : चंद्रकांत पाटील
Indecent act with school girl , Bus driver arrested,
पुणे : बसचालकाकडून शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, कोंढवा पोलिसांकडून बसचालक गजाआड
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
Subsidy e-rickshaw Pimpri, Pimpri municipal corporation,
पिंपरी : ई-रिक्षाधारकांना ३० हजार रुपये अनुदान; काय आहे महापालिकेचा उपक्रम?
Gun Firing at a farmer bungalow , Gun Firing Wagholi,
पुणे : वाघोलीत शेतकऱ्याच्या बंगल्यावर गोळीबार, गोळीबारामागचे कारण अस्पष्ट
Attack on farmer Loni Kalbhor , Attack on farmer with sickle, Loni Kalbhor ,
पुणे : शेतकऱ्यावर सराइताकडून कोयत्याने वार, लोणी काळभोरमधील घटना
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई

शनिवारी, २४ फेब्रुवारीला आणखी एक पश्चिम विक्षोप सक्रिय होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, एक कमी दाबाची रेषा मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत सक्रिय आहे. या हवामानविषयक स्थितीचा परिणाम म्हणून मराठवाड्यात रविवार, २५ फेब्रुवारी ते मंगळवार, २७ फेब्रुवारी दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात पावसाचा काहीसा जोर राहण्याचा अंदाज आहे. शनिवारपासून पुढील पाच दिवस हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. रविवार आणि सोमवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

किमान तापमानात घट शक्य

उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा परिणाम म्हणून पुढील तीन दिवस नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पहाटेच्या किमान तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

Story img Loader