पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई, चालक पदाची भरती प्रक्रिया मंगळवारपासून (३ जानेवारी) सुरू झाली आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक आहे. उमेदवारांना कोणी प्रलोभन दाखविल्यास, तसेच गैरप्रकार आढळल्यास त्वरित दक्षता समितीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलीस शिपाई, चालक भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र देण्यात आले आहेत. संबंधित उमेदवारांनी प्रवेशपत्रात नमूद केलेल्या दिवशी उपस्थित रहावे. उमेदवारांनी कागदपत्रे आणावीत. एखादा उमेदवार अनुपस्थित राहिल्यास त्याला पुन्हा संधी दिली जाणार नाही. भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. कोणी प्रलोभन दाखविल्यास, तसेच गैरप्रकार आढळून आल्यास त्वरित दक्षता अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

हेही वाचा – डिजिटल इंडियाच्या काळात अतिसूक्ष्म उद्योगात रोखीचेच सर्वाधिक व्यवहार, ‘दे आसरा’ संशोधन केंद्राच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार (मोबाइल क्रमांक- ७०२०६९२७९७), पोलीस उपायुक्त आर. राजा (मोबाइल क्रमांक- ९४९०७७६९२८) उपायुक्त संदीपसिंह गिल (मोबाइल क्रमांक- ८२८९००५१३३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पाेलीस शिपाई चालक पदाची भरती प्रक्रिया ३ ते १७ जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे. त्यानंतर पाेलीस शिपाई संवर्गाची भरती प्रक्रिया १८ जानेवारीपासून सुरू हाेणार आहे. पाेलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रिया पार पडणार असून दक्षता समितीही नेमण्यात आली आहे.