पुणे : राज्यसेवा परीक्षेचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यासाठी गेल्या काही दिवसांत झालेल्या आंदोलनांनंतर अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतला. त्यानुसार आता नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्यात येणार असल्याचे एमपीएससीने ट्विटद्वारे जाहीर केले.

एमपीएससीने राज्यसेवा परीक्षेसाठी युपीएससीच्या धर्तीवर अभ्यासक्रम आणि मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरुपाची करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी २०२३ पासून करण्याचेही स्पष्ट करण्यात आले. मात्र नव्या अभ्यासक्रमासाठी वेळ मिळावा म्हणून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्याच्या मागणीसाठी आंदोलने करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरू होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी या आंदोलनाला भेट दिली. मुख्यमंत्र्यांसह दोन दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन शरद पवार यांनी आंदोलकांना दिले. त्यानंतर आता एमपीएससीने २०२५ पासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय जाहीर केला.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
indian-constituation
संविधानभान: जातनिहाय जनगणनेची आवश्यकता
The Supreme Court directed the Ajit Pawar group from the clock symbols
‘घड्याळ’ न्यायप्रविष्ट असल्याचे जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला पुन्हा बजावले
UPSC Preparation UPSC Mains Exam 2024 Overview of the question career
UPSC ची तयारी: UPSC मुख्य परीक्षा २०२४; प्रश्नाचे अवलोकन
dispute in Urans Mahavikas Aghadi in assembly election 2024
उरणमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी

हेही वाचा – ‘दगडूशेठ’च्या गोडसे परिवाराचा पाठिंबा असल्याचा महाविकास आघाडीचा दावा

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे, असे एमपीएससीने ट्विटद्वारे जाहीर केले.