लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (यूजीसी) देशभरातील विद्यापीठांतील पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या समान विद्यापीठ प्रवेश परीक्षेत (सीयूईटी) काही बदल प्रस्तावित केले आहेत. त्यानुसार संपूर्णपणे संगणकीय पद्धतीवर आधारित या परीक्षेला नकारात्मक गुणांकन लागू करण्यात आले असून, सर्वसाधारण परीक्षेचे रुपांतर सर्वसाधारण कलचाचणीमध्ये करण्यात येणार आहे. तसेच, काही विषयांना सर्वसाधारण चाचणीतील गुणांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

देशभरातील पदवीपूर्व, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्यासाठी यूजीसीने सीयूईटी ही परीक्षा सुरू केली. या पूर्वीच्या परीक्षांबाबतच्या प्रतिसादानुसार परीक्षा प्रक्रियेत बदल करून परीक्षा अधिक कार्यक्षम करण्यासाठी यूजीसीने तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती. या तज्ज्ञ समितीने विविध घटक विचारात घेऊन काही शिफारशी केल्या. त्यानुसार २०२५-२६मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावित बदलांचा मसुदा जाहीर करण्यात आला. या मसुद्यावर २६ डिसेंबरपर्यंत हरकती-सूचना नोंदवता येणार असल्याची माहिती यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

आणखी वाचा-देहूरोड संरक्षण विभागाच्या हद्दीतील रखडलेला पालखी मार्ग पूर्ण कधी होणार? नितीन गडकरी म्हणाले…

पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी या दोन्ही स्तरांसाठी संपूर्णपणे संगणकीय पद्धतीने वर्षातून एकदा परीक्षा घेतली जाणार आहे. दोन्ही स्तरांवर नकारात्मक गुणांकन लागू असेल. पदवीस्तरावर एकूण २३ विषय उपलब्ध असतील. विद्यार्थ्यांना कमाल पाच विषयांसाठी परीक्षा देता येईल. बारावीला घेतलेल्या विषयांपेक्षा वेगळे विषय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मात्र, ते विषय पाच विषयांच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका असेल. विद्यार्थ्यांना मराठीसह एकूण १३ भाषांमध्ये परीक्षा देता येईल. टुरिझम, टिचिंग ॲप्टिट्यूड, फॅशन स्टडीज, आंत्रप्रुनरशीप, लीगल स्टडीज, इंजिनिअरिंग ग्राफिक्स या विषयांसाठीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या विषयांसाठीची प्रवेश प्रक्रिया सर्वसाधारण कलचाचणीतील कामगिरीच्या आधारे राबवण्यात येणार आहे.

आणखी वाचा-राज्यातील ‘या’ चार आमदारांना मंत्रीपद देऊ नका;  या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थी संघटनांच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पदव्युत्तर पदवी स्तरावर कौशल्य आणि काही अभ्यासक्रमांसाठी पदवी स्तरानुसार सर्वसाधारण प्रश्नपत्रिका तयार करण्यात येईल. जेणेकरून विद्यापीठांना त्या क्षेत्रातील अभ्यासक्रमांसाठी त्याचा वापर करता येईल. प्रवेश प्रक्रिया सीयूईटी पीजी या परीक्षेतील गुण आणि यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवण्यात येईल. मात्र, काही विशेष अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीयूईटी पीजीला किती गुणभार द्यायचा, या बाबत विद्यापीठे निर्णय घेऊ शकतात, असे नमूद करण्यात आले आहे.