संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते म्हणणारे शाहिस्तेखान,अफजलखान यांच्या कुळातलेच असावे. धरणात लघुशंका करणारे आता इतिहासात लघुशंका करायला लागले. कदाचित तुम्ही पवार नसला, पण छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच होते. अशा शब्दात हिंदू राष्ट्रसेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असे विधान केले होते. त्या विधानानंतर राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्याच दरम्यान आज पुण्यात लाल महाल ते डेक्कन छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या मोर्चात हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी अजित पवार यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. आता या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – पुणे : नव्या संगणकप्रणालीचा म्हाडा सोडतीला फटका? घरांसाठी ६० हजारांपैकी केवळ १८७१ अर्ज मंजूर

मोर्चात आमदार भीमराव तापकीर, तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई, निवृत्त पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे हे सहभागी झाले आहेत. लाल महाल येथून ११ वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरवात झाली. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करण्यात आल्यानंतर लक्ष्मी रोडने हा मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी १ वाजण्याच्या सुमारास पोहोचला. त्यावेळी तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, धनंजय देसाई या मान्यवरांची भाषण देखील झाली.

हेही वाचा – पुणे : बारामतीमध्ये ‘एमआयडीसी’चे स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय

पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

होय मी धर्मवीरच! गो हत्या मुक्त पुणे, फाल्गून अमावस्या अर्थात धर्मवीर दिन, लव जिहाद मुक्त पुणे, असे फलक घेऊन विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. तर या मोर्चात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In a morcha in pune hindu rashtra sena chief dhananjay desai criticize ajit pawar on his sambhaji raje dharmaveer statement svk 88 ssb