पुणे: हास्यकल्लोळ करणारे नेते रामदास आठवले हे भर सभेत चिडल्याच पहायला मिळालं. पुण्यातील तळेगाव येथे जाहीर सभेत त्यांना राग अनावर झाला. पुणे जिल्ह्यात कोयता गँग सक्रिय असल्याचं सांगत असताना कार्यकर्त्यांनी मध्येच फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली. भाषणात व्यत्यय आल्याने त्यांनी जवळच उभा असलेल्या पदाधिकाऱ्याला सुनावत भाषण सुरू आहे. यांना अक्कल नाही का? मध्येच आगाऊपणा करतात. त्यांना चांगले धडे द्या, चांगलं शिकवा असं म्हणत त्यांनी राग व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मावळमधील तळेगाव येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सभेला हजेरी लावली. आठवले यांनी राष्ट्रभक्तीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. पुणे जिल्ह्यात कोयता गॅंग कुप्रसिद्ध आहे. ते कोयता चालवतात. असे आपल्या भाषणात आठवलेंनी उल्लेख केला तेवढ्यात मोठ- मोठ्या आवाजात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. यामुळे आठवलेंना मध्येच भाषण थांबवावं लागले. त्यामुळे त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या कार्यकर्त्याला सुनावले. “भाषण सुरू असताना फटाके कशाला लावले? भाषण चाललं आहे हे यांना समजलं पाहिजे. यांना अक्कलच नाही. मध्येच आगाऊपणा करतात. कार्यकर्त्यांना शिकवा थोडंसं, ट्रेनिंग द्या”. अस शेजारी उभा असलेल्या पदाधिकाऱ्याला रागात म्हणाले.

रामदास आठवले म्हणाले, महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकार हे जाणार नाही. दोघांचं मजबूत सरकार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल देखील आमच्या बाजूने लागणार आहे असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला. २०२४ निवडणूक आम्ही एकत्र लढवू. शिंदेंबद्दल उद्धव ठाकरे यांना काय बोलायचं ते बोलू द्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In a public meeting at talegaon in pune ramdas athawale got angry kjp 91 mrj