आळंदी : अयोध्या, काशी आणि मथुरा ही पवित्र ठिकाणे आहेत. ज्या पद्धतीने श्रीराम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागला, त्याचप्रमाणे कायदेशीररीत्या मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिर देखील निर्माण होईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस हे आळंदीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी गीत- भक्ती अमृत महोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आयोध्या काशी आणि मथुरा ही ठिकाणे अत्यंत पवित्र आहेत. ज्या पद्धतीने राम जन्मभूमी निर्माण झाली, त्या पद्धतीने मथुरा येथे कृष्ण मंदिर निर्माण व्हावे ही लोकांची अपेक्षा आहे. मला विश्वास आहे, ज्या पद्धतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत राम मंदिर निर्माण झाले. त्याच पद्धतीने श्रीकृष्ण मंदिर सौहार्दपूर्ण वातावरणात निर्माण होईल, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. आळंदी मध्ये गीत- भक्ती अमृत महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमाला फडणवीस आले असता त्यांनी हे मत व्यक्त केले.

हेही वाचा : पोलिसांची सूचना डावलून निखिल वागळे सभास्थानी, हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांचा खुलासा

दरम्यान, संजय राऊत सातत्याने करत असलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कोण संजय राऊत? ते काय मोठे नेते आहेत का? मोठे नेते असतील तर मला विचारा अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली. आचार्य प्रमोद कृष्णम यांना काँग्रेसने निलंबित केल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी काँग्रेसवर टीका केली. त्यांचा दोष येवढाच आहे की त्यांनी काँग्रेसला सांगितले की राम आणि राम मंदिराला विरोध करू नका. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचे फडणवीस म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In alandi dcm devendra fadnavis said shri krishna temple in mathura to be build up soon kjp 91 css