आळंदी : महाराष्ट्रात सध्या केवळ मराठा आरक्षणाची चर्चा आणि आंदोलन सुरू आहेत. जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलन करत आहेत. मराठा समाजातील तरुण देखील आक्रमक झाले आहेत. आळंदीत श्रीकांत काकडे या तरुणाने चक्क शोलेस्टाईल आंदोलन करत पोलिसांसह नागरिक आणि कुटुंबाची धाकधूक वाढवली होती. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तरुणाला खाली उतरविण्यात यश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : वर्षभरात पुणे जिल्ह्यात १४ कोटींचे अमली पदार्थ जप्त, पोलिसांच्या कारवाईत ५०४ आरोपी गजाआड

मराठा आरक्षण ही प्रमुख मागणी घेऊन श्रीकांत काकडे हा तरुण थेट आळंदीतील पाण्याच्या टाकीवर पोहोचला आणि फलकाद्वारे त्याने मराठा आरक्षणाची मागणी केली. काही मिनिटांतच कुटुंबीय, नागरिक, पोलीस आणि अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. श्रीकांतची मनधरणी करण्याचे सर्व जण प्रयत्न करत होते. श्रीकांतचे कुटुंबीयदेखील तिथे आले. परंतू श्रीकांत ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणविषयी ठोस निर्णय घेत नाहीत, बोलत नाहीत, असे म्हणत लवकरात -लवकर आरक्षण द्यावं अशी मागणी श्रीकांतने केली. अखेर ४ ते सायंकाळी ६ पर्यंत चाललेलं हे शोलेस्टाईल आंदोलन मनधरणीनंतर मागे घेण्यात आलं आणि श्रीकांतला खाली उतरवण्यात सर्वांना यश आलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In alandi youth did sholay style protest for maratha reservation climbed on water tank kjp 91 css
Show comments