बारामती : शेतीच्या व्यवसायात बरोबर इतर अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे, शासनाने यासाठी विचारपूर्वक निर्णय घेऊन या वेळी अर्थसंकल्पा मध्ये पाचशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती व्यवसायातील विविध समस्या सोडविण्यासाठी या पुढील काळात कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाच्या अनावरण समारंभ कार्यक्रमा नंतर शेतकरी मेळाव्यात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार बोलत होते, बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शिवतीर्थ मंगल कार्यालय येथे झालेल्या या मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र ढवान पाटील, अशोक पाटील, माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, विश्वासराव देवकाते, संभाजी होळकर, सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, रणजीत तावरे,दत्तात्रय येळे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, ” महाराष्ट्र राज्याचा सात लाख वीस हजार कोटीचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला असून या अर्थसंकल्पामुळे राज्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याचाआम्ही विचार घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आणि मी अर्थमंत्री म्हणून मी प्रयत्न करीत आहे, राज्यातील शेतकरी, उद्योग,आरोग्य, रोजगार,शिक्षण त्यासाठी हा अर्थसंकल्प विचारपूर्वक मांडला असून वास्तववादी व्यवहारातून योग्य भूमिका घेऊन राज्याच्या विकासावर परिणाम करणाऱ्या ठरेल, ” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

गुढीपाडवा आणि रमजान ईद च्या शुभेच्छा देत श्री. पवार आपल्या भाषणात पुढे म्हणाले,” १९८४ साली तात्कालीन राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांच्या हस्ते माळेगाव मधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते, या पुतळ्याची काळजी आणि देखभाल लक्षात घेऊनच आता या नवीन पुतळ्याच्या अनावरण समारंभ घेण्यात आला आहे, आम्ही राज्यातील १३ कोटी जनतेचा विचार करून राज्य शासन निर्णय घेतो, ३१ मार्च अगोदर पीक कर्जाचे हप्ते शेतकऱ्यांनी भरावेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांची वीज बिल भरून माफ केली होती, दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी पैशाची तरतूद करण्यात आली, याच बरोबर शासनाचे कर्मचारी पगार, पेन्शनदार, लाईट, पाणी,रस्ते या मूलभूत गरजा व विकास कामासाठी राज्य सरकार खर्च करत असते, याचाही विचार जनतेने करावा, पूर्वी साखर कारखान्याला आयकर भरावा लागत होता, मॉलीसेस वर २८% कर होता, तो कर आता कमी करुन पाच टक्के करण्यात निर्णय घेण्यात आला,साखर कारखान्याना आय करातून मुक्तता केली , या महत्त्वाच्या निर्णयामुळे साखर कारखानदारी आज टिकली आहे, असा खुलासाही त्यांनी यावेळी बोलताना केला.

बारामतीच्या विकासासाठी एक हजार कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे, बारामतीच्या दूध संघामध्ये पशुखाद्य कारखान्यासाठी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे, धरणातील पाईपलाईन हे बंद नळीतूनच केले जाणार आहे, जनतेने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, कालव्याचे पाणी जून पर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

माळेगाव कारखान्याने वीज निर्मिती प्रकल्प चालू केला आहे, तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने उत्तम पद्धतीने काम करून सभासदांना चांगला भाव जाहीर केला आहे, असे असताना काही विरोधक विनाकारण कारखान्याच्या कामाबाबत बदनामी करत आहेत,ही बाब योग्य नाही, माळेगावचा साखर कारखाना हे माळेगावचे वैभव आहे, या कारखानदारीवरच आपले प्रपंच चालतात, कारखान्याकडून चांगला भाव मिळतो, आणि विकास कामे केली जातात, असा खुलासा या अजित पवार यांनी आपल्या भाषणातून केला.

राज्यातील युती सरकार हे पाच वर्ष टिकेल , या पुढील विकास कामासाठी साखर कारखाना, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुकांमध्ये युती पुरस्कृत उमेदवारांनाच निवडून द्या, असे आवाहन करून अजित पवार पुढे म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यामुळे विकास कामांना गती मिळत असून कऱ्हा आणि निरा हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार, येणाऱ्या पाच वर्षात बारामतीचा पाच हजार कोटी खर्च करून विकास करणार, तसेच कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेती उत्पादन वाढीबरोबरच शेतीसाठी पाणी सुद्धा कमी लागेल, शेती उत्पादन वाढीस लागेल, आणि शेत जमिनीचा पोत सुधारून उत्पादित मालाला योग्य भाव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभिक कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांनी प्रारंभी प्रास्ताविक करून कारखान्याच्या विकास कार्याचा आढावा दिला, या शेतकरी मेळाव्याला कारखान्याचे सभासद राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

मलिदा गँगनी नकोस केलं – अजित पवार

मलिदा गँगनी नकोस केले आहे, ठेकेदारांनी ठेकेदारीचेच काम करावे, राजकारणामध्ये येऊन पुढारपण करू नये, घेतलेली कामे हे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, कारण संस्थेची कामे हे संस्थेसाठी असतात, ती संस्था टिकली पाहिजे वाढली पाहिजे, यासाठी प्रयत्न केलेला असतो, दहा लाखाच्या आतील कामे दर्जेदार पद्धतीने होत नसल्याने आता या पुढे टेंडरने कामे दिली जाणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

फोटो काढून विकास होत नाही – अजित पवार

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा नाम उल्लेख न करता अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले, मतदारांच्या घरी जाऊन फोटोला नमस्कार केला की तालुक्यातील विकास कामे होत नाहीत, विकास कामासाठी नीती उपलब्ध करून द्यावा लागतो, त्या निधीतूनच विकास कामे होतात. असा टोलाही अजित पवार यांनी यावेळी बोलताना लगावला.