बारामती : बारामती येथील चर्च ऑफ क्राईस्ट बॉईट होमच्या बाल सुधार गृहातून तीन मुले अधीक्षक यांची परवानगी न घेताच (ता. १८ फेब्रुवारी ) मंगळवार रोजी पळून गेलेली होती,ती पोहण्यासाठी कालवा मध्ये उतरल्यावर त्यातील एकाचा बुडून मृत्यू झाला आहे ,

या बाबत बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिलेल्या महिती नुसार मंगळवारी (दि. १८/०२/२०२५ )रोजी पोलीस स्टेशन बारामती शहर येथे चर्च ऑफ क्राईस्ट बॉईज होम येथील बालगृह अधीक्षक रॉबर्ट वसंत गायकवाड यांनी खबर दिली की त्यांचे बालगृहांमध्ये सन २०१८ पासून दाखल असणारी मुले राजवीर वीरधवल शिंदे ,( वय १५ वर्षे ) हा व त्याचे दोन मित्र अर्जुन वाघारी व मोईन अमीर शेख असे मिळून बालगृहा मधून कोणालाही काही न सांगता मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी सांयकाळी साडे चार वाजता बारामती मधील नटराज पार्क येथे फिरायला गेली होती, त्यानंतर ते शेजारील कालव्यात आंघोळ करण्यासाठी उतरले असता यातील मुलगा राजवीर वीरधवल शिंदे यास पोहता येत नसल्याने तो पाण्यामध्ये बुडून वाहून गेला होता.

मंगळवार ( दिनांक १८ फेब्रुवारी ) पासून या मुलाचा कालव्यात शोध घेतला असता आज गुरुवारी रोजी एका मुलाचा मृतदेह बांदलवाडी ता. बारामती या ठिकाणी कालव्याच्या पाण्यात आढळून आला आहे. बालगृह अधीक्षक रॉबर्ट वसंतराव गायकवाड यांच्या जबाबावरून आकस्मित मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करून या प्रकरणी अधिक तपास बारामती शहर पोलीस निरीक्षक विशाल नाळे हे करीत आहेत.

Story img Loader