बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांचा नियोजित पुरंदर दौरा रद्द करण्यात आला आहे. पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी पुढील काही दिवस त्यांना विश्रांती घ्यावी लागेल, अशी माहिती मिळत आहे.

शरद पवार यांनी शनिवारी दिवसभरात विविध संस्थांच्या बैठकीला हजेरी लावली. विद्या प्रतिष्ठान येथे बैठक सुरू असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले, ही बाब त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना सांगितली. त्यानंतर डॉक्टरांनी पवार यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
chatura loksatta marathi news
स्त्री आरोग्य : नववर्षाचा संकल्प; फिट राहा!
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
Advay Hire , Malegaon Bazar Committee Chairman,
मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे अपात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का

हेही वाचा : पिंपरी : अभियंत्यांच्या दप्तर दिरंगाईमुळे महापालिकेविरोधात न्यायालयात अवमान याचिका; दोन्ही अभियंत्यांचे निलंबन

पुढील काही दिवस शरद पवार हे पूर्णपणे विश्रांती घेतील, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, त्यांना विश्रांती घेणे आवश्यक असल्यामुळे त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

हेही वाचा : पुणे : संगणकीय प्रणालीचा सांकेतिक शब्द चोरुन जन्म दाखल्यात फेरफार; महापालिकेकडून पोलिसांकडे तक्रार

दोन दिवसांपूर्वी पवार हे दिल्लीत होते. त्यानंतर ते पुण्याहून खास दिवाळीच्या सणासाठी बारामतीला आले. या दरम्यान झालेली प्रवासाची दगदग, दिल्ली येथील वाढते प्रदूषण यामुळे त्यांच्या घशाला त्रास झाला असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. प्रवासादरम्यान विश्रांती न घेतल्यामुळे पाठीचा ही त्रास त्यांना होत आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे काही कारण नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Story img Loader