बारामती : ‘वहिनी, तुम्ही हे केले. पण, सांगितले नाही….’ अशा आशयाचे शीर्षक देत बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांचे परिचयपत्रक प्रकाशित करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा : एमएचटी-सीईटीसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत करता येणार अर्ज?
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांची गळाभेट
राजकारणात विरोध असला तरी कौटुंबिक पातळीवर आम्ही एकत्र आहोत, असा संदेश खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी गळाभेट घेऊन दिले. बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यात लढत होण्याची शक्यता असताना महाशिवरात्रीनिमित्त या दोघींची भेट झाली.
First published on: 09-03-2024 at 17:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In baramati sunetra pawar introductory book launch vahini tumhi he kele pan sangitle nahi pune print news vvk 10 css